हे 'असं' कसं?

घट्ट विण
असलेली नातीही,
कधी ढिली पडतात...
कळवळतो, विव्हळतो जीव!

सतत शस्त्र खाली टाकून
'गरज' आहे, असं सांगण्याची
सवय आडवी येते!!
'आपलचं माणूस' आहे ना?
असा आवाज पुन्हा येतो...
मनाला समजावणं, की
भुलावणं?
वरच्यालाच ठाऊक....!

मग एक 'अस्फूटसं' हास्य,
मन हारल्याची आपली जाणिव...
अन्
जग जिंकल्याचा 'विजयी' भाव
त्याच्या चेहर्‍यावर.....

नाती अशी टिकतात का?
'एकाच्याच' गरजेखातर??
कळत नाही...
पण;

दरवेळी असंच घडतं खरं.......!!

Post a Comment

1 Comments

  1. खूप अस्वस्थ करून सोडलंत...
    On an instant afterthought,
    गरज दोघांनाही, सगळ्यांनाच, असते. ती आपण एकमेकांकडे किती व्यक्त करतो, त्या गरजेसह कसे वागतो... हे महत्वाचं... कुणाची तरी गरज भासूनही ती आपल्याच माणसाकडे न मागणं/ न मागता येणं हे तर कितीतरी वाईट...

    ReplyDelete