गाठं बांधला शालू...!

दोन भिन्न व्यक्ती म्हटल्या, की
मतभेद आलेच ओघाने!

सप्तपदींची सात वचनं,
साता जन्माची नोंदणी,
नकोच मुळी....

एकच वचन- आहे त्या जन्मापुरतं...!!

"गाठ बांधला शालू तुझ्याच पदरा.."
ही गाठ आहेच मधोमध,
उभय परिवाराने मिळून बांधलेली..!
इतर दोन सुटी टोके बांधूयात, आपणच
आपापल्या कंबरेभोवती!

हात-पाय मात्र मोकळे,
प्रेमासाठी- भांडणांसाठी...

दुरावा आलाच तर तो
शाल-पदराच्या लांबीइतकाच!
मधली गाठ राखलीही जाईल
कदाचित...

हवंय फक्त,
वचन...
कंबरेभोवतीच्या गाठी जपण्याचं,
त्यांना सैल न पडू देण्याचं....!
दुराव्याच्या प्रत्येक झटक्यानेही,
ह्या गाठी घट्टच होऊ देत!

Post a Comment

1 Comments

  1. gathi odhalya ne gath ghatt hote, kalpana farach awadli.

    ReplyDelete