इथे...!

जगाची गणितं सोप्पी असतात,
'त्रास होतो' समजलं, की
डिवचणारे हजर होतात...!

म्हणून एकतर
त्रास करूनच घ्यायचा नाही...
देणं जमलं नसेल तर
हुंदकाही उमटू दयायचा नाही!

इथे,
लढायला,
इथलीच वस्त्रं लागतात,
जिंकत पुढे जायला
आधुनिक शस्त्र लागतात....!!

Post a Comment

1 Comments