परिटघडी...!

"तुला माझी साथ आहे"
शब्द, शब्दच राहतात
तेव्हा वेदना हेलावते
भावना गोठतात
चेहरा शांत असला,
तरी आतला कोपरा दुखावतो
फक्त असे कोपरे दुमडत जाऊन
मन संकुचित होऊ नये
इतकं जपतेय..

शेवटी,
मनाची 'परिटघडी' 
जितकी नेटकी 
आयुष्याला तितकाच,

कोरेपणा

-बागेश्री

Post a Comment

0 Comments