.... पुन्हा!!

सांज साजरी
सखी लाजरी,
आठव बोचरी
रुतली पुन्हा...

पेटलेले रान
उन्हाला तहान
सुन्न वहीचे पान,
मिटले पुन्हा...

दमलेला श्वास
श्रमलेली आस,
अवघडले त्रास
दुर्मुखले पुन्हा...

तू असण्याचे भास
मनाचे खोटे कयास,
निराशेने खास
गाठले पुन्हा...

आशेनेच फसवणे
जगासवे हेलकावणे,
मिळवून गमावणे
घडले पुन्हा...

शुभ्र तेवती वात
काळावरही मात,
एक नवी सुरुवात
भरारले.... पुन्हा!!

Post a Comment

0 Comments