खळगा

एखाद्या आठवणीचे
पडसाद उमटण्याचे थांबले की
पडलेल्या खळग्याचे,
भकासपण जाणवते...!

खळग्याची ओल
डोळ्यांतही उरली नाही
की अलिप्तपणा काचतोच...
कोरडा उदास खळगा
मात्र टिकुन राहतो,
चिरे घट्ट करत..
आता उपयोगात नसलेला,
परंतू आस्तित्व टिकवून असलेला.....!

-बागेश्रीPost a Comment

0 Comments