पाऊलवाट सारी, रात्री भिजून गेली...

माझी एक खूप जूनी कविता येथे देत आहे दोस्तहो...
कशी वाटली ते कळवावेत..

---------------------------------------------------------------------------------------

पाऊलवाट सारी, रात्री भिजून गेली...
बिलगून गेल्या वडाला, नाजूक जाईच्या वेली....
आठव क्षणाची तुझी ही, कडा पाणावून गेली...
मी थांबून "तिथेच" आहे, युगे निघून गेली.....
पाऊलवाट सारी, रात्री भिजून गेली...

जाणवली का कधी रे, अस्वस्थता ही शिगेची?
अंगणात तुझ्या सख्या "ही", पणती तेवत राहिली.....
आससून जगत राहिले मी, वळला नाहीस कधीही,
मरणे कित्येक माझी, मी ह्या डोळ्यांनी पाहिली.....

वेगळ्याच असतात वाटा रे, अन वाटसरू ही वेगळे.....
उरतो फक्त मृद्घंध, अन ती नजरा नजर पहिली ....
उन्मळला वड एकदा, अन कोमेजून गेल्या वेली...
पाहवला का ते तुजला, तू दे मला कबुली....

बरसतील पुन्हा जलधारा, मोहरण्या उदास वेली...
नवजीवन देण्या करिता सृष्टी, धरा अवतरली....
थांबुनी राहतील युगे, भेट घडवाया आपुली....
मोहरतील क्षण रे सारे, अन वेळही होईल ओली....
पाऊलवाट सारी, रात्री भिजून गेली...

Post a Comment

0 Comments