तटस्थ....!!

आपलं कसं असतं ना.....

वारंवार काही जागा, वस्तू, वास्तू
ह्यांच्या सान्निध्यात येत गेलं
की ते 'आपलं' वाटायला लागतं...काळानुरूप...!
आणि
मतं बदलत जातात,
वयानुरूप.....!!

दररोजच्या जगण्यात,
काही गोष्टी तर मुरत जातात...
आत-आत
त्यांनाच आपण 'मुल्ये' म्हणतो का...
काही रुजलेली, काही आत्मसात केलेली..
पण;
हीच मग नाक घालू लागतात, आपल्या
प्रत्येक निर्णयात..!!

आणि मग, त्यांनाच
सांभाळतांना, आपणच कधी
'त ट स्थ' होत जातो,

उमगत नाही....!

Post a Comment

0 Comments