.....चित्र तसं पूर्ण होत आलंच होतं!!

अनेक उभ्या- आडव्या
रेखा जोडत,
पूर्णत्वाचा आकार
साकारला गेलाच होता,
......चित्र तसं पूर्ण होत आलंच होतं!!

घोंघावणारा वारा होता,
शमलेली धूळ होती,
पावसाचा भास होता,
सुख- दु:खाची सरमिसळ होती...

आता हवी फक्त 'एक रेषा'
तुझ्या ओठांच्या दोन टोकांना जोडणारी
निर्जीव ह्या चित्रात,
स्मितहास्य भरणारी..

रंगाशिवायही जुळून आलेलं
ते एक रेखाचित्र होतं,
शेवटच्या ह्या रेषेनंतर
आजन्म जपावं असं गुपित होतं,
......चित्र तसं पूर्ण होत आलंच होतं!!

पण;
नियतीचं वादळ चुकलंय कुणाला?
माझा कागदच उडवून नेलाय....

Post a Comment

3 Comments

  1. कवितेच्या शेवटच्या दोन आेळी वाचकाला स्तब्ध करतात........

    ReplyDelete
  2. भानस, अगदी आवर्जून प्रतिसाद देत असतेस, तुझ्या प्रतिसादांची वाट पहाते मी, हुरूप येतो.. :)

    गणेश, :)

    ReplyDelete