हे 'असं' असावं....

असमाधानाची जळमटे नाहीत
अस्वस्थतेची धूळ नाही..!
आठवणींचा बोचरा वारा नाही अन्
खारट पाण्याची डबकीही...... नाहीतच

गंजलेली शस्त्र नाहीत, की
जीर्ण झालेली वस्त्रदेखील.... नाहीत!

सगळं कसं स्वच्छ... नेटकं..

दारात सुबक रांगोळी..
सताड उघडी तावदानं,
नितळ सूर्यप्रकाश,
आत- बाहेर उनाड खेळता वारा..
फुलांचे सुवास,
सजीवतेचा मंगल भास..

छे!
हे माझं मन नसावंच....

परवा जाता जाता,
काही विसरून गेला आहेस का?

-बागेश्री


   

Post a Comment

0 Comments