खिळा..

एखाद्या नाजूक भावनेला,
आपण जप जपतो
अगदी,
आपल्या आस्तित्वाचं पांघरूण घालत!
पण;
वास्तवाची हातोडी हुकलीये कुणाला?
त्यापेक्षा
त्या भावनेलाच द्यावं सोडून,
ह्या जगात!
पडेल- उठेल,
धडपडेल- सावरेल,
निगरगट्ट होईल..
टक्के टोणपे खात खात
घट्ट होईल..!
धातूच्या खिळ्यासारखी..

मग,
नशीबाच्या भिंतीवर
आपल्याच यशाचं एखादं चित्र टांगायला
वापरता येईल...
तीच, कोणेकाळची तलम भावना...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments