विश्वरूप

सांजेचं अस्ताव्यस्त रूप
पाहून चर्र झालं..

तिची ती ओढत नेलेली पाऊले
पायात ना मावळतीच्या चपला,
ना खांद्यावर मेघांचा पदर..
आकाशी भाळावरचं,
भलं मोठं बिंबही...  फिकूटलेलं
झटापटीत पुसल्या गेल्यासारखं मलूल
विरत विरत चाललेलं..

काळोखाचे पडदे झरतील आता..

परतेल तीही, तिच्या घरी..
जरा अवघडली- जरा बरी

तिच्या ह्या विश्वव्यापी रुपाला
मेणबत्त्यांचा मोर्चा पुरेल?

-बागेश्री

Post a Comment

2 Comments

 1. केवळ अप्रतिम.
  Abstract चा पदर घट्ट धरून चालणारे तपशील.
  अखेरीस एका अनोख्या अनुभवाची परम सीमा गाठतात.
  मस्त.
  शब्द वाचायचे, शिकायचे नाही तर अनुभवावे लागतात.
  हे सिद्ध करणारे लेखन.

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks Yashwant for the comment.....

   Delete