तुझ्या नपुंसक मर्यादा,
ती सहज पदाराखाली घेऊन वावरते तेव्हा,
तिच्या उदार स्त्रीत्वाचं कौतुक होण्याची अपेक्षा तिला नसावीच..
खंबीरपणे सार्या त्रुटींच्या भेगा सांधत जाते तेव्हा,
नाजुकपणा गळून राकट झालेल्या चेहर्याला तू सुंदर म्हणावंस, अशीही अपेक्षा नसेल..
जगण्यातला सगळा रखरखीतपणा तिच्या कोरड्या डोळ्यात स्पष्ट दिसू लागेल आणि तरीही......
तरीही,
कधी एखादा हळवा चुकार शब्द फ़ोडेल तिचा पान्हा...
त्या फुटलेल्या पान्ह्याने ओलावलेल्या पदराला मात्र हसू नकोस, चुकूनही!
तुझ्या वृथा मर्दुमकीलाही तिने तिथेच थारा देऊ केलाय....
-बागेश्री
1 Comments
Great
ReplyDelete