पतंग

एखाद्याची आठवण तुमचा
पतंग करून टाकते,
न स्वेच्छेने विहरता येतं
न उतरता!

धागा त्रयस्थाच्या हातात,
अन आकाश तिर्‍हाईताचं!
पतंगाचा कागद तुमचा म्हणून
उरण्या- फ़ाटण्याचं नशीबही तुमचंच!

शेवटी
त्रयस्थानंच काळजीपूर्वक उतरवून घेण्याची अपेक्षा करावी तर

सबंधांचा धागा कधीच कच खाल्लेला!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments