जीर्ण प्रिय वस्त्र तैसे नाते

जिवापलीकडे जपतो तेव्हा,
नात्यावर उमटलेली
एखादी हळवी सुरकूतीही, स्पष्ट जाणवते!

भलेही आता ते नातं उतरवून ठेवलेलं का असेना!

आपण मात्र सारं कसब पणाला लावत
परिटघडी नव्याने बसवायची..
कुठलाही मुडपा न बसू देता
सुरकुती काढून
फिरून रूप देखणं करायचं

अशा लहरी सुरकूत्या पडत राहणार,
हे ही ध्यानी धरायचं!

पण लहर फिरली म्हणून
समोरच्याने उभ्या उभ्या,
नेटानं राखलेलं
परिटघडीचं वस्त्र
बोहारणीला देऊन टाकायचं?

आतल्या डांबर गोळीसकट?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments