विणकाम

"काय पसारा मांडलाय " म्हणत
वैतागून माझ्या पुढ्यातून चालत निघतोस
निवांत बाहेर जाऊन बसणार असतोस...

मी तेवढ्याच निगूतीने
तेवढ्याच निष्ठेने
पुढचा टाका विणायला घेते

बारिक बारिक तंतूही मला लागतात
हवं ते साकार करताना!
वस्त्राचा पोतही राखायचा असतो
पाण्यात टाकल्यावर पाणी शोषणारा, पण
आपला रंग कधी न सोडणारा,
आकर्षक
दर्जेदार पोत!
अगदी तुझ्यासारखाच...

हे वस्त्र लेऊन
रूबाबदार दिसशील...
अशा खात्रीने एक एक विण
घट्ट होत जाते

जरा असाच बस, हलू नकोस
तुझ्या पायाला लागलेले
माझे तंतू काढून घेऊ दे...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments