Auto pilot

डोळे मिटायचे म्हणजे,
दिवसभर दुर्लक्षिलेलं वादळ
अंगभर ओढून घ्यायचं!
घालू द्यायचं त्याला मुक्त थैमान,
घेऊ द्यायचा ताबा
मनाचा, मेंदूचा!
वादळही संधी मिळताच मग्रूर!
निवडतं हवे ते हार्मोन्स,
पिळतं वाट्टेल तसे....
आणि, बघता बघता एक प्रक्टिकल माणूस
इमोशनल होतो!
त्या वादळाचं समाधान होईपर्यंत, त्याने ताबा सोडेपर्यंत,
आपण असेच
...ऑटो पायलट वर!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments