कधी कसे तर, कधी असे रे!

उन्हात रणरण
चालत जाता
वाटेवरल्या 
उभ्या मोडक्या
मंदीराच्या
त्या वळणावर
कधी मंदशी
झुळुक होऊन

पाणी पाणी 
जिव होताना
कुठुन अचानक
येतो कोणी,
ज्याची माझी 
ओळख नाही,
होतो पाणी
तहान घेउन

गाणी जेव्हा 
गावी वाटे 
सूरही नाही 
शब्दही नाही,
तेव्हा अवचित 
येते कविता
आकाशाचे
गाणे होउन 

चिंब जागत्या 
क्रुर रात्रीचा
डंख काळसर
डोळा रुतता
दूर अंधूक
कंदिल होउन
होतास तिथे
मिणमिण करता

तुला वाटते,
भेट आपली
उशिरा झाली
फार फार पण
जगून गेले
आहे तुजसव
अनेकवेळा
अनेक क्षण मी..
कधी कसे तर, कधी असे रे..

-बागेश्री

Post a Comment

1 Comments