दिवा

आठवणीच्या कोनाड्यात
एक दिवा तेवता ठेव...
भरून असू दे मनगाभारा
त्या मखमली प्रकाशाने....

कधी तेल- वात कर
कधी काजळी काढ!

जेव्हा कधी घोंघावतं वादळ येईल 
उद्ध्वस्त करण्याचा मानस घेऊन,
तेव्हा तुझ्या तळहातांचं कोंदण दे वातीला

उजळतील निमिषात हात आणि
भारशील तू
अद्वैत प्रकाशात!
तूच जपलेला मऊ उजेड
अशी देऊन जाईल साथ...

पुढेही अनेक वादळे पेलशील,
दिवा तेवता ठेवण्याचा वसा टाकला नाहीस तर!!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments