खुंटी

अडकवून ठेवला आहे तिने तिचा पदर,
त्याच्या अस्तित्वाच्या खुंटीला!

लक्षात येत जाते तिला मर्यादा,
पदराला बसणार्या प्रत्येक हिसक्यानिशी...

तिचं परिघ आखलं गेलंय,
तिचं आभाळ मोजलं गेलंय..

तिचे हात मजबूत आहेत
पायामध्ये ताकद आहे

तरीदेखील,
तकलादू खुंटीला बळकट मानण्याचा संस्कार,
राखतो आहे तिचं घर...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments