व्याख्या

तू प्रेमाच्या व्याख्या करण्यात मग्न होतास तेव्हा
मी अनुभवत होते तुला..
तुझ्या पंचेद्रियांची थेट जाणीव
होण्याचेच प्रसंग आहेत आठवणींत..

किती वेळेस
तुझं दुखरं अंग मी
सहन केलंय आणि केलीय मलमपट्टी
जणू माझ्याच अंगावरच्या जखमा ओल्या..
माझं हसणं तू घेऊन
मी ठसठस अनुभवली ना रे,
कित्येकदा!

पाठ फिरवून जाताना
तुझ्या रंध्रांतून निघणारं
खारं पाणी मी माझ्या अंगावर टिपलंय..

आणि तू किती सहज म्हणून गेलास..
'Sorry, माझ्या व्याखेत बसणारं प्रेम नाही तुझं'

-बागेश्री

Post a Comment

0 Comments