निश्चला

मी पाहिला होता
तुझ्या हसर्या डोळ्यांमागचा
दु:खाचा खळाळ झरा...

झालं होतं ओझरतं दर्शन
तुझ्या उघड्या पाठीवरच्या,
मोकळ्या ओल्या केसांचं..!
निळसर गर्द केसांतून
टपटपणारं दु:ख, मी पाहिलं होतं

की,
पाहिली होती
दुडदूडत आलेल्या अनोळखी
निरागस सुखाला उचलून
कवेत घेतलेली,
छातीशी कवटाळणारी, निश्चला?

क्षणभर हसलेल्या त्या डोळ्यांमागे
चमकत राहिलाय झरा...
ओलेत्या केसांची तू!
आणि शेजारी
मातीत खेळण्यात मग्न झालेलं सुख!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments