हळवेपण

जगताना काळजाचे हळवे कोपरे
दुमडून आले होते!
कायम वाटत राहिलं,
इतक्या वर्षांत ते कोपरे निर्जीव झाले असतील...
आज सवडीने त्या त्रिकोणी घड्या उघडून पाहिल्या
तर तसं झालय खरं...!

फ़क्त जिथं मुडपा घातला होता
त्या रेषांवर गर्द हळवंपण अजूनही उरलंय....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments