धडपड

तुला घडलेल्या घटनांचे पडसाद वाटतात,
त्याला असंस्कारित मुक्तछंद वाटतो..
तिला शेवटी पंच असलेलं स्फुट वाटतं

कुणाला बौद्धिक
कुणाला दुर्बोध
कुणाला गुंतागूंत वाटते..

मला निसटून गेलेल्या भावनांना मांडण्याची,
माझी केविलवाणी धडपड वाटते!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments