सत्य

तू एक सत्य आहेस!
जगताना सापडलेलं पारदर्शक सत्य!

तुझ्या अस्तित्वाच्या काचेतून
सुस्पष्ट दिसतं स्वत:चं आयुष्य!
वरचा थर गळून पडतो
खरा दिसू लागतो...
हा चेहरा चकचकीत, गोरा गोमटा नाही
ओबड धोबड आहे
सच्चा आहे,
राबून राठ झालेली त्वचा आहे
पाठीवर वास्तवाचे वळ आहेत,
अंगाखांद्यावर रक्ताचे ओघळ आहेत...
ते पाहताना डोळ्यांची आग होते,
डोकं जड पडू लागतं,
'सत्य पचवणं कधी सोपं असतं?'

सगळी हिंमत एकवटून
तुझ्या काचेपासून वेगळं व्हावं लागतं,
अंगावरचा अखंड मुलायम थर चाचपून हायसं वाटतं!

'जीभेवरचा कडवटपणा मात्र बराच वेळ जात नाही'

-बागेश्री

Post a Comment

0 Comments