माणूस

तू एक काम कर...
तुझं दगडी कलाबूती रूप, बाजूला सार
खऱ्या महाकाय रुपात प्रकट हो!!

मला मांडीवर घे
तुझ्या मऊसूत हातांनी माझं शरीर सोलून काढ़..
आपल्यात एक करार करू,
तू अश्रू येऊ देऊ नकोस
मी विव्हळणार नाही!

एक जन्म तिच्या कुशीतून झाला होता,
हा जन्म तुझ्या हातून होऊ दे!

अंगावरच्या पूटांमूळे आत काही झिरपत नव्हतं,
आता ती सोय होईल!
माणूस होऊन जगायचं राहिलंय,
माणूस म्हणून जगता येईल....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments