हरवलेली कविता

तिला एकाएकी त्या कवितेचा संदर्भ लागला...
मग त्या कवितेचा शोध सुरु झाला, अधीरतेने!
माळावरच्या रद्दीत,
पर्समधे घड्या करून ठेवलेल्या कागदांत,
वहींच्या मागच्या पानावर,
पुस्तकात मुड़पून ठेवलेल्या खुणेत,
कपाटात फळ्यांवर अंथरलेल्या वृत्तपत्रांखाली..

पण,
...तिने ती कविता हरवलीच आहे!

गवसलेल्या संदर्भात अस्वस्थ घिऱट्या घालणंच तिच्या हाती उरलंय...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments