मी

एक एक माणसांची पायरी करुन तो वर आला
बरंच उंच आल्यावर जाणवलं,
आभाळ कायम उंचच जातं
क्षितीजही आभासी असतं..!

आता खाली यायचंय!
निघायला बघतोय तेव्हा कळतंय
एक एक पायरी विरत चालली आहे....

स्वत:ला खाली झोकून देण्याशिवाय पर्यायही नाही
त्याला झेलायला मात्र एका पायरीने नक्की झोळी केली असेल...!
तो अलगद झेलला जाईल, तेव्हा मात्र पूर्णत: नवा व्यक्ती असेल...

त्याच्यातला "मी" त्या आभासी उंचीवरच राहिलाय...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments