ऋण

कथेतल्या एका पात्राने, दोन्ही हात पसरवून
गच्च मिठीत घेतलं..

म्हणालं, "हे सगळं अगदी असंच होतं, जगाला कधी सांगायचं होतं. कुणापाशी तरी बोलायचं होतं. जमलं नाही तेव्हा. तुझ्या कथेत उतरलो आहे. तुझा ऋणी असेन मी, कायम"
डबडबलेले डोळे, मायेची मिठी सुटल्यावर वाटलं,

...कोण कुणाच्या ऋणात?

उतराई कसं होऊ?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments