गृहप्रवेश

ती आली.
ती गेली.
जावं लागलं.

पुन्हा परतून येताना
तेवद्या हक़्क़ाने उंबरठा नाही ओलांडला.
दाराशीच थांबली
आतली चाहूल घेत.
तिच्याशिवाय आजही आत,
पोकळी पोकळी होती
गडद गार अंधारही.
कुठल्याशा कोप-यात
मिणमिणती अशक्त वात पेटली
तिला दोन डोळे दिसले,
भिरभीरत काही शोधणारे
टपोरे. पाणीदार. अस्वस्थ
त्यांना दिसली दारातून आत डोकवणारी, क्षीण साऊली!
ओळख पटली.

त्याने हात देऊन पुन्हा तिचा गृहप्रवेश करून घेतला.
आता घरात उजेड असतो.
चहल पहल असते.
त्याच्या चेह-यावर फ़क्त आनंद!

त्याला वाटतंय,
सारं पूर्ववत आहे..

तिच्या मनातला अंधार मात्र दिवसेंदिवस गडद होतोय

-बागेश्री

Post a Comment

0 Comments