हात सुटत जातात

हात सुटत जातात
धागे मोकळे होतात
आठवणी विरतात
नव्या पर्वाचा संतूूर

आठवणी कोमेजतात
शब्द बोथट होतात
सलही विरतात
हवा गंधित नूर

जुन्या गोष्टी सरतात
संदर्भ मागे पडतात
नव्या हाका येतात
भावना आतूर

जागा बदलतात
रेशीम धागे जुळतात
हळू हळू गुंततात
लागे हुरहूर

मने एक होतात
गारुड वाहून नेतात
आनंदे डोलतात
नित्याचा सूर

बंधने वाढतात
पायात अडून पाडतात
भड़के उडतात
नात्याचा धूर

-बागेश्री

Post a Comment

0 Comments