बाकी सगळं ठीक

कुणी जवळ येऊन दुरावतं, तेव्हा
जवळ येतानाच्या ठश्यांवरच,
परततानाचे ठसे उमटतात... गडद होतात

उमटलेल्या बोटांची दिशा मात्र बदललेली असते...
तेवढीच रूतत राहते
बाकी सगळं ठीक.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments