आकाश

मी तुझ्यावर पसरलेलं माझं आकाश, आवरायला घेतलंय
जाता जाता बेभान बरसेन "कदाचित",

घे मनसोक्त भिजून.

गारठल्यावर निवार्‍याला मात्र हक्काच्या छपराखाली जा...

आकाशाचं फसवं रूप मनात गिरव..
त्यानं आकर्षून घेतलं.
कधी रंग दाखवून
तर कधी चमक!
काळा गडद अंधारही आवडवा, अशी मोहिनी.
बरसलं, कधी भुरभूर, कधी अवकाळी बेभान.
प्रत्येक हरकतीने गुंतवून ठेवलं.

पण; ते कायमच लहरी.
छपरासारखं स्थिर नाही.
तू इथे जमिनीवर.
आकाशाला बांधशील तरी कसा.

तू पाहिल होतंंस त्याचं तुझं होणं,
तुझ्यावरती पसरून राहणं.....
आता जाणं बघतो आहेस.

घूसमटशील उबदार छपराखाली,
आकाशाच्या लहरीपणाला दूषणं देत..

तिथेच मूटकूळं करून निजताना
जाणवेलंही,

त्याने तुझ्या छप्पराला कधी धक्का नव्हता लावला..

-बागेश्री

Post a Comment

0 Comments