भाग्यरेखा

एखादा दिवस फुलपाखराचे पंख लाऊन येतो
नाजुकपणे तळव्यावर उतरतो
रेंगाळतो..
आपल्या हाताची रेषा न रेषा न्याहाळायला भाग पाडतो....
आपण मग्न असताना अलगद उडूनही जातो!

भाग्यरेखा रंगीत झालेल्या पाहिल्यात मी

-बागेश्री

Post a Comment

2 Comments