शुभं भवतु

हातावर दिलंस निरोपाचं दही
"शुभं भवतु"ची नित्याची पुटपूट
डोळ्याखालच्या समजूतदार सुरकूत्या
कोरडे राखलेले डोळे! 

दह्याची कवडी मी ओठांआड करताना
डोळ्याखालच्या सुरकुत्यांतली थरथर लपली नाही.
मी निघून जाताना
वळून बघणार नाही
तुझे डोळ्यांकडे जाणारे हात.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments