औक्षण

माझ्या अस्तित्वाला औक्षणाचं तबक करुन 
डोळ्यांच्या निरांजन तुझ्यावर ओवाळून टाकताना,
तू उन्मत्त होऊन तबक उधळलंस
आणि शेजारी जळत राहिली सारी स्वप्नं!

विचारतात मला
तुला करता आला नाही का त्रागा, की
नाही मागता आला तुझा हक्क?

त्यांना कुठल्या शब्दांनी सांगायचं
कोवळ्या स्वप्नांचे चित्कार
बधिर करणारे असतात...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments