हळहळ

मी फक्त स्त्री - पुरुष निर्माण केले
ना कुणी सबल
ना कुणी अबल

"तो" खातो, पचवतो, उत्सर्जन करतो, शिंकतो, खोकतो, श्वास घेतो.
"ती" खाते, पचवते, उत्सर्जन करते, शिंकते, खोकते, तिला पाळी येते
दोघांनाही आपापले सहजधर्म दिले.
मी त्या सहजधर्मात होतो, आहे, राहील.

त्यांनी एकत्र यायचं होतं
एकमेकांसाठी पूरक जगायचं होतं

माझं एक चुकलं,
त्यांना बुद्धी दिली.
त्यांनी मंगळ- अमंगळ, शुद्ध- विटाळ गोष्टी शोधल्या.

मी त्यांना समान बनवून श्रेष्ठत्व बहाल केलं.
त्यांनी विचारातल्या विटाळाने कनिष्ठत्व सिद्ध केलं.

माझी निर्मिती माझ्या भेटीचे नियम बनवते आहे.
निर्मात्यापेक्षा निर्मिती मोठी होते आहे.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments