समुद्र

समुद्रकिना-यावर ती चालत होती
ठसे उमटत राहिले
तो एक एक ठसा वेचत निघाला
ती आत्ममग्न
तो आत्ममग्न
समुद्र आत्ममग्न
एकाएकी ठसे किना-याशी लुप्त झाले
तो आजही अनेक प्रश्न घेऊन काठाशी उभा आहे

-बागेश्री

Post a Comment

0 Comments