धुकं

एखाद्याच्या अदृश्य कसोटीवर
आपल्या भावना तासल्या जातात
सतत,
खात्री पटेस्तोवर!
खात्री पटल्यानंतरच
हात पुढे सरसावतो
जवळ करू पाहतो

अशा हाती आपण केवळ धुके होऊन येतो

-बागेश्री

Post a Comment

2 Comments

  1. असं का होत बागेश्री....!? दृष्याच्या कसोटीवरील भावना असफल होतात, हे कडू आणि कडवे सत्य समजून घेता येते.पण अदृष्याच्या कसोटीवरही असफलता यावी....दुख: हाच मानवी जीवनाचा स्थायी, अशाश्वत भाव आहे काय?

    ReplyDelete
  2. असं का होत बागेश्री....!? दृष्याच्या कसोटीवरील भावना असफल होतात, हे कडू आणि कडवे सत्य समजून घेता येते.पण अदृष्याच्या कसोटीवरही असफलता यावी....दुख: हाच मानवी जीवनाचा स्थायी, अशाश्वत भाव आहे काय?

    ReplyDelete