अस्तित्वाची धून

मौनाची एक माळ गळ्यात
उठावदार टपोरे मोत्यांची..
कुणी विचारे
डोळ्यांतली चमक
मोतियाची का? 
फक्त हसावे
डोळ्यांतली चमक लख्ख व्हावी.
शांततेचा आवाज ऐकला आहेस?
ब्रम्हनाद तो,
दिसायला गूढ
असायला गार!
गात्रे जिथे एकजीव होतात
अस्तित्वाचा गहनबिंदू
एकदा भेटावे त्याला
स्वतःची सूफी सुरावट गवसते..
मग्न होत झुलताना
हाताशी येते,
तीच मौनाची माळ!
एक एक टपोरा मोती
निखळत राहतो
त्याची टप टप आणि अस्तित्वाची धून
एकच!


-बागेश्री

Post a Comment

0 Comments