श्रद्धा

खोटा पायथा
कळस खोटा
खोट्या गाभारी
अंधार खोटा

खोटा गवगवा
कोपणे खोटे
खोट्या दगडाचे
शेंदूर खोटे

आम्ही खरे
श्रद्धा खरी
दगडावरी
माया करी
धरायास
वेठीवरी
सगुण रूपा
उभे करी

अंतरंगी
दांभिक असू
खोटे खोटे
तुला वसू
बांधू देवळे
करु सोहळे
आम्ही पाळू
आमचे सोवळे

तुही मोठा
एका जागी
भक्तांच्या रांगा
सुखे भोगी
असूनही
चराचरी
अडकलास
चौथ-यावरी

तुही खोटा
आम्ही खोटे
आपल्यातले
करार खोटे

ये सोबती
करार मोडू
श्रद्धधेला
श्रद्धधेने जोडू

-बागेश्री

Post a Comment

0 Comments