शपथभूल

चांदण्यांची शपथभूल 
मोडता यायला हवी..
राहत्या वस्तीतून 
उठता यायला हवं..
आकाशाची स्वप्नं उशाशी 
जगणं फुलण्याची आस निरंतर
आशेची माती
भेगाळता
रेंगाळणं टाळता यायला हवं
आपल्यापूरतं आपलं गाव
वसवता यायला हवं

नसो भांडवल हाती
नसो कुणी साथी
वास्तवाने डोळे विसळावे
आयुष्या सामोरे जावे
आपल्यापरीने आपलं नाव
मिळवता यायला हवं
स्वतःमधलं पूर्णत्व
गवसता यायला हवं
आपल्यापूरतं आपलं गाव
वसवता यायला हवं

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. Really nice.. 'Vaastavane dole visalayala have' is a excellent thought !!

    ReplyDelete