बेबनाव

तुझिया बटात वारा
घुसतो मुजोर सारा
त्याची कलंदरी ही
तुजला बरीच वाटे

पडला गरीब तोही
नसला तुझा तरीही
त्याची उनाड मस्ती
तुजला खरीच वाटे

हलकेच मी छळावे
मग तू त्वरा रुसावे
हा बेबनाव आहे
मज खातरीच वाटे

-बागेश्री

Post a Comment

0 Comments