मयसभा

मी शोधत राहते तुला मला जोडणारा पूल
ज्याच्या आधाराने,
तुझ्या डोळ्यातून खोल उतरू जायचंय...
तसं तर
तुला जाणून घेण्याची उत्सुकता
केव्हाच संपलीय
तुझे कच्चे पक्के दुवेही
लक्षात आले आहेत
नात्यातल्या राजकारणावर
दोघांचाही विश्वास नाही
ते दुवे म्हणूनच पडीक आहेत!
तुला खोटं बोलायला आवडतं. पेक्षा,
विभ्रम तयार करायला आवडतात...

तुझ्या आत नक्कीच एखादी मयसभा आहे!

तिच्यात फिरून येण्याची ओढ लागलीय..
तुझे अनेक विभ्रम समजून आले असले तरी,

माझा दुर्योधन होण्याची शक्यता
नाकारता येत नाही
....... ओघानं महाभारत आलंच..
                                           बागेश्री

Post a Comment

0 Comments