निरागस

तुझ्या दगदगीच्या, धावपळीच्या
उर फुटेस्तोवर
स्पर्धा करण्याच्या
दैनंदिन जगण्यात
हलकेच सरकवते मी
तुझ्या पाकिटात
चार क्षण
सुखाचे, निवांतपणाचे..!

कामाच्या धावपळीतच
कधीतरी पाकीट काढून
तू छकुलीच्या
फोटोचा पापा
घेतोस, तेव्हा
तुझा सैलावलेला ताणही
गाली हसू लागतो....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments