कोडं

कल्पनेच्या कुठल्या
प्रदेशात वावरतोस
आणि उमटवतोस
अद्वितीय निर्मितीचे ठसे,
वास्तवावर?

असे ठसे 
जे वाहून जाणार नाहीत
काळाच्या प्रवाहात किंवा
मिटणारही नाहीत
पृथ्वीचे अनेक
थर उलटले तरी..
कारण
काही निर्मितींना संपण्याचं भयच नसतं...!

तुझ्या निर्मिती ह्यांपैकी एक, की
तूच निसर्गाची कालातीत निर्मिती
... इतकं कोडं सुटावं बास!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments