आई


तुझ्याशी तादात्म्य पावते
आणि झरु लागतात डोळे
कितीतरी दूर असतो आपण
परस्परांपासून
तुझ्यावर झालेला वार
मी पाहिलेलाही नसतो
पण
तितकीच खोल
जखम होते
इथेही
आत आत
जुन्या निश्चयाचा मेरु
वितळत जातो
जखम क्षणिक
वार करणारे आपलेच
तेव्हा ह्याच घावाला
उद्या तू मिरवू लागशील
हेही जाणते तरीही
डोळे झरत जातात
जखम सलत जाते....
तू नाळेपासून वेगळं
केलं असशील फार पूर्वी
पण तुझाच अंश असलेल्या
मनाचं काय करु?
-बागेश्री

Post a Comment

0 Comments