पुस्तक

मी पुस्तक उघडतो, शब्द तिथेच असतात
एखादं मुडपून ठेवलेलं पान उघडतो, संदर्भ तिथेच असतात..

तू माझ्यापुरती ठेवणीतल्या अशाच एखाद्या पुस्तकासारखी आहेस.
कधीही हाती घ्यावं, निवांत होत.. त्यात हरवून जावं..
तू बोलून गेलेला, शब्द न् शब्द अजूनही तसाच आहे
अर्थही तेच आहेत..

फक्त, जसा तुला वाचत जातोय
गहिरा होतोय..!
                            बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. बागेश्री, तुला एक नवा संदर्भ मिळाला आहे....त्याचं तू त्याचं काव्यरूप घेतलं आहेस...धन्य आहे ....

    ReplyDelete