तुझ्या बंद पापण्याआड


जेव्हा तू स्वस्थ निजला असशील
एक व्यस्त यशस्वी दिवस
मागे सारून आणि
नसेल झाली सवड
मला पळभरही स्मरण्याची
पण जमिनीवर अंग टाकून
जाणिवे नेणिवेच्या पार जाशील
जिथे तुझी सत्ताच चालत नाही
तिथे,
येईन मी उतरून

तुझ्या बंद पापण्याआड.....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments