चाफा (गज़ल)

मनीचा ऋतू पार बहरुन आला
जणू आत चाफाच डवरून आला

हळूवार सैलावता मेघ काळे
सरींतून पाऊस उतरुन आला

जराशी कलंडे कुपी आठवांची
खबर गंध चौफेर पसरून आला

जरासा जरासा तुझा तोल जाता
कसा वेग श्वासास कहरून आला

खरा हा दिलासा असे मानुया की
जुना कोणता डंख जहरून आला

                                   बागेश्री

Post a Comment

2 Comments